परशुराम आर्थिक विकास मंडळ स्थापन करण्यासाठी ब्राह्मण समाजाच्या इतर मागण्यासाठी बसलेल्या दीपक रणवरे यांच्या उपोषणास अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था करमाळा शाखेचा पाठिंबा
करमाळा प्रतिनिधी जालना येथे परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे व इतर मागण्यांसाठी आमरण उपोषणास बसलेले श्री. दीपक रणवरे यांना पाठिंबा देण्यासाठी जालना येथे उपोषण स्थळी अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिक केंद्र करमाळा केंद्रप्रमुख संतोष कुलकर्णी सचिव बाळासाहेब होशींग कार्यवाह निलेश गंधे व ऊपाध्यक्ष राजेंद्र सूर्यपुजारी यांनी भेट दिली असुन या उपोषणाला पाठिंबा दिला आहे.
