गुळसडी येथील ग्रामदैवत काळभैरवनाथ जयंतीनिमित्त 5 डिसेंबर रोजी धार्मिक कार्यक्रम महाप्रसादाचे आयोजन*
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील गुळसडी येथे सालाबादप्रमाणे या वर्षीही श्री काळभैरवनाथ यांचा जन्मोत्सव सोहळा व भैरवनाथ जयंती मंगळवार दिनांक 5 डिसेंबर रोजी उत्साहात व भक्तीमय वातावरणात पार पडणार आहे,तरी सर्व गुळसडी ग्रामस्थांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे. असे आवाहन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाची रुपरेषा पुढीलप्रमाणे.
5, डिसेंबर रोजी सकाळी ठिक6.30वाजता:-श्री ग्रामदैवत काळभैरवनाथ मंदिर येथे अभिषेक सोहळा संपन्न होईल, त्यानंतर सकाळी 9 वाजता भव्य असा कलगीतुरा कार्यक्रम संपन्न होईल, त्यानंतर दुपारी 12 वाजता श्री कालभैरवनाथाची महाआरती संपन्न होईल, त्यानंतर संपूर्ण ग्रामस्थांना महाप्रसादाच्या लाभ घेण्यासाठी पंगत होणार आहे तरी या सर्व कार्यक्रमाचा गुळसडी ग्रामस्थांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
