प्राणीमित्र डॉक्टरांच्या सहकार्याने बाॅबीला मिळाले जीवदान
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील कुंकू गल्ली येथील बाॅबी नावाच्या श्वानास पायावर गाडी गेल्यामुळे दोन पायाला जखम झाल्याने बाॅबीची तब्येत बिघडली होती. त्यामुळे ती झोपुन बाॅबी वेदनेने विव्हळत होती अशा अवस्थेत प्राणीमित्र पुर्वा पांढरे,प्राची वायकर,जान्हवी सुर्यवंशी,तन्वी सुर्यवंशी, आनंदी होनप,साची होनप,रूद्राक्ष होनप,अगस्ती होनप,श्रध्दा शहा,दर्शना शहा या प्राणीमित्रांनी सरकारी दवाखान्यात जाऊन पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर बाळकृष्ण कांबळे यांना बाॅबी या कुत्रीवर ताबडतोब उपचार करावा अशी विनंती केली त्या विनंतीनुसार सहाय्यक पशुसंवर्धन अधिकारी डाॅ.हंबीरराव डुकळे यांनी कुंकू गल्ली येथे स्वतः येऊन बाॅबीला इंजेक्शन देऊन व ड्रेसिंग केले त्यामुळे योग्यवेळी उपचार मिळाल्यामुळे बाॅबी या कुत्रीचे प्राण वाचले असुन प्राणिमित्रांनी डॉक्टर बाळकृष्ण कांबळे हंबीरराव डुकळे यांनी मुक्या प्राण्यांचा प्राण वाचवुन माणुसकीचा धर्म पाळल्यामुळे आभार मानुन कौतुक केले आहे.
