करमाळा

श्री ज्ञानेश्वर वाचन मंदिर मुक्तद्वार वाचनालय येथे कार्यशाळा संपन्न

 

करमाळ प्रतिनिधी : शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक योजना राबविण्यात येतात. ग्रंथालयांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी सतत अद्ययावत राहिले पाहिजे. त्यातून अधिक चांगल्या सेवा सुविधा देता येईल असे प्रतिपादन ग्रंथमित्र जिल्हा ग्रंथालय संघाचे
मार्गदर्शक कुंडलिक मोरे यांनी केले.

सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघ यांच्या वतीने श्री ज्ञानेश्वर वाचन मंदिर मुक्त द्वार वाचनालय करमाळा नगरपरिषद करमाळा येथे एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सचिव भास्कर पवार, जिल्हा ग्रंथालय संघाच्या लिपिक वृषाली हजारे, संजय मोरे, संचालक प्रमोद बेरे यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी करमाळा तालुक्यातील सार्वजनिक वाचनालयाचे प्रतिनिधी पदाधिकारी,ग्रंथपाल, अध्यक्ष हे मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदरकार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री ज्ञानेश्वर मंदिर वाचनालयाचे ग्रंथपाल दत्तात्रय घोलप, ग्रंथालय सेवक प्रदीप चौकटे यांनी परिश्रम घेतले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!