Thursday, September 17, 2026
Latest:
करमाळा

रक्षाबंधन हा प्रेमाचा संदेश देणारा संपूर्ण देशामध्ये बहिण भावाच्या निःस्वार्थ प्रेमाचा हा सण जगाला आदर्शवत -प्राचार्य बाळासाहेब नरारे सर

 करमाळा प्रतिनिधी रक्षाबंधन हा प्रेमाचा संदेश देणारा सण संपूर्ण देशामध्ये बहिण भावाच्या निःस्वार्थ प्रेमाचा हा सण जगाला आदर्शवत असल्याचे मत सुरताल संगीत विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब नरारे सर यांनी व्यक्त केले.
रक्षाबंधनानिमित्त सौ पाटील मॅडम यांच्या निवासस्थानी सुरता संगीत विद्यालयाचे ‌ प्राचार्य बाळासाहेब नरारे सर करमाळा डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे तालुकाध्यक्ष पत्रकार दिनेश मडके यांनाही रक्षाबंधन निमित्त मुकबधीर शाळेच्या ‌आदर्श शिक्षिका सौ.सुलभा चक्रधर पाटील मॅडम यांनी राखी बांधून त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी पुढे बोलताना बाळासाहेब नरारे सर म्हणाले की भारतीय संस्कृतीमध्ये मोठी विविधता आहे. त्यामुळे आपण प्रत्येक सण मोठ्या आनंदाने साजरे करतो. यामध्ये भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याचा आणि निस्वार्थी प्रेमाचा संदेश जगाला देणारा हा आदर्शवत असा सण आहे. आदर्श कुटुंब पद्धती निर्माण करणारी ही संस्कृती आहे. सर्व जाती धर्माचे लोक आनंदाने एकत्र राहत आहे. सण मोठ्या उत्साहाने साजरे करत आहे. आज सर्व धर्माच्या भगिनी इतर धर्माच्या भावांना रक्षाबंधनानिमित्त राखी बांधतात ही आदर्श परंपरा नक्कीच कौतुकास्पद आहे.महिलांचे शिक्षण महिलांची सुरक्षितता हे प्रत्येक भावाचे कर्तव्य आहे. यासाठी प्रत्येकाने काम करणे गरजेचे असून आदर्श परंपरा जपताना देशात आणि समाजात बंधुभाव वाढीस लागेल यासाठी काम करावे असे आवाहन बाळासाहेब नरारे सर यांनी केले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!