करमाळा

कोंढारचिंचोली येथील डिकसळ पुल जड वाहतुकीसाठी कायमस्वरूपी बंद. बँरीकेटर्स काढण्याचा प्रयत्न केला तर गुन्हा दाखल केला जाईल- सामाजिक कार्यकर्ते देविदास साळूंके

प्रतिनिधी वाशिंबे
कोंढारचिंचोली ता.करमाळा येथील भीमा नदीवरील ब्रिटिश कालीन डिकसळ पुलास १६७वर्ष पूर्ण झाली असून सदर पूल हा ४०वर्षाहून अधिक काळ सतत पाण्यात उभा आहे.त्यामुळे जड वाहतूकीसाठी धोकादायक बनल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सोमवार दि.११ रोजी लोखंडी बँरीकेटर्स लावून जड वाहतूक बंद करण्यात आली.

करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातील गावांना भिगवण बारामती येथे जाण्यासाठी हा प्रमुख पुल होता. साखर कारखान्यांची उस वाहतूक याच पुलावरून होत असते सद्या या पुलाचे वयोमान झाले असून सावित्री नदीवरील पुलाची दुर्घटना झाली तशी घटना टाळण्यासाठी व पूल चांगला राहावा या करिता या भागातील सामाजिक कार्यकर्ते व कोंढार चिंचोलीचे मा.सरपंच देविदास साळुंके हे गेली ५ते ६ वर्षांपासून जड वाहतूक बंद करणेसाठी शासन दरबारीं प्रयत्न करीत होते.जड वाहतूक ही पर्यायी मार्गानी करून प्रशासनाला सहकार्य करावे, बँरीकेटर्स काढण्याचा कोणी प्रयत्न केल्यास संबंधित खात्याअंतर्गत रीतसर गुन्हा दाखल करण्यात येईल सर्वांनी घ्यावी जड वाहतुकीसाठी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे देविदास साळुंके यांनी सांगितले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group