Thursday, April 17, 2025
Latest:
करमाळाक्रिडासकारात्मक

आमदार संजयमामा सुपुत्र यशवंतभैय्या संजयमामा शिंदे यांना शूटिंग स्पर्धेमध्ये सुवर्णपदक.

 

कन्हेरगांव  प्रतिनिधी

माढा तालुक्यातील निमगाव टें चे सरपंच यशवंत भैय्या संजयमामा शिंदे यांनी शूटिंग स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळवले आहे.
नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडिया अँड राजस्थान रायफल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जयपूर राजस्थान येथे 31 व्या ऑल इंडिया जी व्ही मावलणकर शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी आमदार संजयमामा शिंदे यांचे सुपुत्र तथा निमगाव टें चे सरपंच यशवंत संजयमामा शिंदे यांनी शूटिंग स्पर्धेमध्ये भाग घेऊन सिंगल ट्रॅप मध्ये सुवर्णपदक पटकावले आहे.
रायफल शूटिंग स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळवल्याबद्दल यशवंत शिंदे यांचे आमदार बबनराव शिंदे , आमदार संजयमामा शिंदे , माढा वेल्फेअर फाऊंडेशनचे अध्यक्ष धनराज दादा शिंदे यांनी त्यांचे कौतुक केले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group