करमाळा

दत्तकला इंजिनिअरिंग महाविद्यालयात (AI) या अभ्यासक्रमास मान्यता संशोधन क्षेत्रात आघाडी घेण्यास विद्यार्थ्यांना संधी

करमाळा प्रतिनिधी दत्तकला ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन या अभियांत्रिकी महाविद्यालयास शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ पासून कृत्रिम बुद्धीमत्ता (AI) या अभ्यासक्रमास “ऑल इंडिया कॉन्सिल ऑफ टेक्नीकल एज्युकेशन (AICTE), दिल्ली” यांचेकडून मान्यता मिळालेली आहे.
दत्तकला इंजिनिअरिंग महाविद्यालयामध्ये काळानुरूप सर्व शाखा उपलब्ध असून त्यात (Al) कृत्रिम बुद्धीमत्ता या शाखेचा समाविष्ठ झाल्यामुळे AI Technology ची सर्वच क्षेत्रातील गरज ओळखून महाविद्यालयाने Al या अभ्यासक्रमासाठी मा. अध्यक्ष श्री रामदासजी झोळ सर यांचे मार्गदर्शनाखाली AICTE कडे अर्ज केला होता. सर्व प्रगतशील क्षेत्रात संशोधन करण्यास विद्यार्थ्यांना मोठी संधी मिळणार आहे.
(Al) कृत्रिम बुद्धीमत्ता या शाखेच्या यशस्वी वाटचालीबदल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रामदासजी झोळ सर यांचा नेहमीच पुढाकार असून, त्यांचा प्रत्येक नवीन वाटचालीबदल सक्षम पाठींबा असतो. विद्यार्थ्यांना नवीन Tech ची उपलब्धता व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाल्यांबाबत कठिबद्ध प्रयत्नांना यश आले असून सदर AICTE चे Online छाननी साठी मा. सचिवा सौ. माया झोळ स्वतः उपस्थित राहून आवश्यक पूर्तता करणे संदर्भात समिती बरोबर चर्चा केली. तसेच मा.प्राचार्य, व प्रा. शितल धायगुडे, डीन अकॅडमीक, डॉ. अनारसे, डिन रिसर्च, व डॉ. बेरे, एच.ओ.डी. कॉम्प्युटर, व श्री. सांळुखे, यांनी प्रस्तावासाठी व इतर कामासाठी मोलाची कामगिरी निभावली.
सदर अभ्यासक्रमास मान्यता मिळणे कामी मा. सचिवा सौ. माया झोळ यांचा सिंहाचा वाटा असून भविष्यामध्ये (Al) साठी सर्वोतपरी सहकार्य करण्याची भूमिका व्यक्त करून सर्व प्राध्यपकांना Al अभ्यासक्रम राबविण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

error: Don\'t try to copy. Content is protected !!