Uncategorized

अजितदादांच्या भक्कम साथीने संजयमामा शिंदे आदिनाथ कारखाना यशस्वी चालवणार-जिल्हाध्यक्ष अभिषेक आव्हाड

 आदिनाथ महायुती बचाव पॅनल च्या पाठीशी ताकतीने उभे रहा – जिल्हाध्यक्ष अभिषेक आव्हाड*

करमाळा प्रतिनिधी सोलापूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील सर्वात महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या करमाळा तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर करण्याची निवडणूक लागली आणि दोन्ही बाजूने जोरदार प्रचार करत अनेक नेत्यांनी एकमेकांवर जहरी टीका केल्या, परंतू गेल्या अनेक वर्षांपासून आदिनाथ ची सत्ता भोगलेल्या तालुक्यातील नेतेमंडळींनी स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी, सर्वसामान्य शेतकऱ्यांचा विचार न करता जाणूनबुजून आदिनाथ कारखाना बंद पाडला, सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक प्रमाणात ऊस गाळप करून कामगारांना न्याय देणारा सहकारातील क्षेत्रातील महत्वाचा कारखाना म्हणजे आदिनाथ कारखाना अशी एकेकाळी ओळख असणारा कारखाना आज कित्येक वर्ष झालं धूळ खात बंद पडला आहे आणि. याला जबाबदार फक्त आदिनाथ ची अनेक वर्षांपासून सत्ता भोगलेले तालुक्यातील नेते मंडळी आहेत. आदिनाथ कारखान्याला जर गतवैभव प्राप्त करून देयचं असेल आणि कारखाना सुरळीत चालू करायचा असेल तर माजी आमदार संजयमामा शिंदे हेच यशस्वीरीत्या कारखाना चालवू शकतात, मतदारांनी लक्षात घेतले पाहिजे कि संजयमामा हे स्वतः कारखानदार असून कारखाना चालवण्यासाठी लागणाऱ्या सर्व बारीक सारीक गोष्टींचा त्यांचा परिपूर्ण अभ्यास आहे, कारखान्यावरील कर्ज फेड असू नाहीतर कामगारांच्या पगारी च देणं असू मामांनी आदिनाथची निवडणूक लागायच्या आधीच पूर्ण अभ्यास केला असून त्याबाबतीत उपमुख्यमंत्री अजित दादांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली आहे, संजयमामा हे सत्तेत असलेल्या महायुती चे एक मोठे नेते असून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या खास मर्जीतले नेते आहेत..”मामांनी काम सांगायचं आणि अजित दादांनी ते काम पूर्ण ताकतीने पूर्ण करून देयचं” हे करमाळा तालुक्यालाच नव्हे तर संपूर्ण सोलापूर जिल्ह्याला ठाऊक आहे, अजित दादांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील कित्तेक बंद पडलेल्या सहकारी व खाजगी साखर कारखान्यांना मदत करून ते पूर्वावस्थेत आणले आहेत, गेल्या काही महिन्यांपूर्वी अजित दादा करमाळा तालुक्याच्या दौऱ्यावर आले असता “तुम्ही संजय मामांच्या पाठीशी उभे रहा मी आदिनाथ आणि मकाई कारखाना जाग्यावर नाही ना आणला तर अजित पवार नाव सांगायचो नाही” असे भर सभेत वक्तव्य केले होते. अजित दादा हे आदिनाथ कारखाना चालू करण्यासाठी संजयमामांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार हे त्याच वेळी त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे करमाळा तालुक्याने पाहिले होते. केंद्रात देखील अमित भाई शहांकडे सहकार खात असल्याने संजयमामा शिंदे हे अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली आदिनाथ कारखान्याला लागेल ती मदत आणू शकतात हे उघड आहे. त्यामुळे करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी आदिनाथ कारखाना सुरळीत चालू करण्यासाठी महायुती आदिनाथ बचाव पॅनल च्या पाठीशी ताकतीने उभे राहून संजयमामांच्या सर्व शिलेदारांचा पतंग आदिनाथच्या उज्वल भविष्यासाठी उंच उडवावा असे आवाहन अजित दादांच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सोलापूर जिल्हाध्यक्ष अभिषेक आव्हाड यांनी केले आहे

error: Don\'t try to copy. Content is protected !!