Uncategorized

आदिनाथ कारखाना संजिवनी पॅनल’ला मतदान म्हणजे सहकार व मतदारांचा कारखान्यावरील मालकी हक्क टिकवण्यासाठीचे मतदान आमदार नारायण आबा पाटील

करमाळा प्रतिनिधी आदिनाथ कारखाना संजिवनी पॅनल’ला मतदान म्हणजे सहकार व मतदारांचा कारखान्यावरील मालकी हक्क टिकवण्यासाठीचे मतदान होय असे ठाम मत आमदार नारायण आबा पाटील यांनी व्यक्त केले व सभासदांना मतदानाचे आवाहन केले. वांगी नं १ येथील सभेत ते बोलत होते. आदिनाथ कारखाना संजिवनी पॅनल’ची शेवटची प्रचारसभा वांगी १ येथे पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी अरुण अण्णा पाटील होते तर व्यासपीठावर  करमाळा नगरपरीषद अध्यक्ष वैभवराजे जगताप, सभापती अतुलभाऊ पाटील
, जयप्रकाश बिले सर, बापूराव आणा देशमुख, गोपाळदादा मंगवडे, हरीभाऊ गरड, अखलाख जागीरदार, गौतमना मोरे, क्षेत्रा बंड‌गर, पोपट सातव, भिमराव घाड, संजय गजेंद्र देशमुख, संदीप मारकड, चंद्रप्रकाश दराडे, नितिनदादा हिवरे, आप्पासाहेब भोसले, दत्ताञय आरकिले,, रावसाहेब कदम, सुशांत अर्किले, दिगंबरभाऊ पाटील, तानाजी काका देशमुख, भाऊ तावसे
दशरथ बापू देशमुख, धनंजय गायकवाड, नानासाहेब गोडगे, भाऊ गोडसे, नाना तकीकभैरू हराळे, भैय्या बंडगर,  नितिन देशमुख, राजेंद्र नरसिंग देशमुख, हणुमंत पाटील, संजय कदम
हिराजी चौगुले, सुधिर रोकडे, विकास पाटील उमेदवार दशरथ हजारे, दत्तात्रय देशमुख, दादासाहेब पाटील, दत्तात्रय जाधव, चंद्रकांत देशमुख, पांडूरंग देशमुख, राजाभाऊ राखुंडे, युवराज दिवटे, विशाल तकीक, विठ्ठल शेळके, आप्पा चौगुले, सांगावे मामा, अमोल पाबळे किरण बोरकर, सुनिल पवार, आजित वगरे
उमेदवार महेंद्र पाटील, विजयसिंह नवले, राजाभाऊ कदम, रामेश्वर तळेकर, देवानंद बागलवसंत अंबारे, रविकिरण फुके, हनुमंत सरडे आदि उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार नारायण आबा पाटील म्हणाले की आदिनाथ कारखाना उर्जित अवस्थेत आणण्यासाठी सभासदांनी मतदार म्हणून जबाबदारीची भुमिका बजावली पाहिजे. सत्ता दिल्यास आदिनाथ कारखान्याच्या उर्जित अवस्थेत आणण्यासाठी पारदर्शक व काटकसरीने कारभार करू. वरिष्ठ पातळीवर निधी मिळवण्यासाठी मंत्री दालन व  बँकेचे उंबरे झिजवण्याची आपली तयारी आहे. आदिनाथ कारखान्यांकडून जी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना व कामगारांना अपेक्षित आहे तसे महत्वाचे प्रकल्प भविष्यात राबवले जातील. सर्वोच्च ऊस दर व कामगारांना वेळेवर दरमहा वेतन‌ हे मुळ उद्देश काटेकोर पणे पाळले जातील असे अभिवचन आमदार नारायण आबा पाटील यांनी दिले. प्रास्ताविक पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी केले तर यावेळी बापुराव देशमुख, दादासाहेब पाटील, महेंद्र पाटील, देवानंद बागल, वैभवराजे जगताप आदिंची भाषणे झाली. वैभव पाटील यांनी आभार मानले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!