स्व.डॉ. प्रदीपकुमार जाधव-पाटील यांच्या जयंतीनिमित्त सुपर स्पेशालिटी शिबीर, रक्त तपासणी व मुळव्याध उपचार शिबीर

करमाळा (प.प्र.) : आदिनाथ कारखान्याचे माजी चेअरमन स्व.डॉ. प्रदीपकुमार जाधव-पाटील यांच्या १८ एप्रिल रोजी असणाऱ्या जयंतीनिमित्त आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्था व जाधव-पाटील हॉस्पिटल यांच्या वतीने मोफत सुपर स्पेशालिटी शिबीर, सवलतीच्या दरात रक्त तपासणी शिबीर व सवलतीच्या दरात मुळव्याध उपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
१८ एप्रिलला मोफत सुपर स्पेशालिटी शिबीर जाधव-पाटील हॉस्पिटल, करमाळा येथे होणार असून यामध्ये हृदयरोग तज्ञ, अस्थीरोग तज्ञ, पोटविकार तज्ञ, फुफ्फुसाचे तज्ञ, नवजात शिशु हृदयरोग तज्ञ, कॅन्सर तज्ञ, मानसोपचार व मेंदू विकार तज्ञ, न्यूरो सर्जन आदी मान्यवर तज्ञांकडून विविध आजारावरील रूग्णांची मोफत तपासणी केली जाणार आहे. हे शिबीर सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत चालू राहणार आहे. १८ एप्रिलला जिजाऊ पॅथॉलॉजी लॅबच्या वतीने १५ ते २० एप्रिल या कालावधीत सवलतीच्या दरात रक्ताच्या चाचण्या केल्या जाणार आहेत; अशी माहिती डॉ. शिवानी रोहन पाटील यांनी दिली.२० एप्रिलला सवलतीच्या दरात मुळव्याध उपचार शिबीर सकाळी आठ ते तीन या वेळेत जाधव-पाटील हॉस्पिटल येथे संपन्न होणार असून यामध्ये प्रसिध्द मुळव्या तज्ञ डॉ. प्रदीप तुपेरे हे रूग्णांची तपासणी करणार आहेत. तरी रुग्णांनी आपली नांवनोंदणी करून या शिबीराचा लाभ घ्यावा; असे आवाहन डॉ. रोहन जाधव-पाटील व डॉ. शिवानी रोहन पाटील यांनी केले.


