छत्रपती शिवाजी तरुण मंडळातर्फे वारकऱ्यांना चिवडा वाटप
करमाळा प्रतिनिधी
करमाळा शहरातील सावंत गल्ली येथे सुनील बापू सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी तरुण मंडळाच्या वतीने पंढरपूर कडे जाणारे वारकऱ्यांना चिवडा वाटप करण्यात आला
यावेळी माजी समाज कल्याण अधिकारी गोपाळ बापू सावंत,आर, जी, पाटील माजी उपनगराध्यक्ष दादासाहेब सावंत आदी जण उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी तरुण मंडळाच्या वतीने अनेक वर्षांपासून सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात त्यापैकी गेल्या वर्षापासून आषाढी एकादशीला पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी वीस हजार चिवडा पाकीट चे वाटप करण्यात येणार आहे.
