वारकऱ्यांना टायगर ग्रुप महाराष्ट्र नवनिर्माण सेना चालक-मालक संघटनेच्यावतीने उपवासाच्या पदार्थांचे वाटपाचा स्तुत्य उपक्रम -विनोद घुगे साहेब
करमाळा प्रतिनिधी संतश्रेष्ठ निवृती महाराज पालखी सोहळयातील वारकऱ्यांसाठी टायगर ग्रुप महाराष्ट्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना चालक मालक संघटना करमाळा यांच्यावतीने चिक्की वेफर्स उपवासाचे पदार्थ देऊन वारकऱ्यांना अन्नदान करून वारकऱ्यांची सेवा करण्याचा उपक्रम स्तुत्य असल्याचे मत करमाळा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद घुगेसाहेब यांनी व्यक्त केले आहे.यावेळी टायगर ग्रुपचे अध्यक्ष तानाजी भाऊ जाधव, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष नानासाहेब मोरे, जैन संघटनेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष प्रदिपशेठ बलदोटा,चालक मालक संघटनेचे सर्व सदस्य उपस्थित यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की सध्याच्या युगामध्ये माणुसकी धर्माचा विसर पडत असून वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून अध्यात्मातुन मानवतेची खरी शिकवण भक्तीच्या माध्यमातून मिळत असून ऊन वारा तहान भूक विसरून विठ्ठलाच्या नामामध्ये दंग होणारे वारकरी बघितल्यानंतर परमार्थातच खरा आनंद असल्याचे जाणवते. संतश्रेष्ठ निवृत्ती महाराज यांच्या पालखीची वारकऱ्यांची सेवा करण्याचा मान करमाळा तालुक्याला मिळतो एक भाग्य असल्याचे विनोद घुगेसाहेब यांनी सांगितले. यावेळी हजारो वारकऱ्यांनी याचा लाभ घेऊन त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले आहे.
