Friday, April 25, 2025
Latest:
करमाळा

करमाळा एमआयडीसी मधील भूखंड वाटपास सुरुवात उद्योजकांनी लाभ घ्यावा जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांचे आवाहन

करमाळा प्रतिनिधी
छोटे छोटे भूखंड उपलब्ध व्हावे या मागणीसाठी आपण विशेष प्रयत्न केले असून उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून करमाळा एमआयडीसी मधील पाच पाच गुंठ्याचे दहा भूखंड उद्योजकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले असून यासाठी इच्छुकांनी ऑनलाईन अर्ज करावेत असे आवाहन जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी केले आहे. यापूर्वी करमाळा एमआयडीसी मध्ये दोन एकर पाच एकर दहा एकर अशी भूखंड होते.त्याचे छोटे छोटे भूखंड करावेत अशी मागणी होती यामुळे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या आदेशानुसार पाच ते सहा गुंठ्याचे 90 प्लॉट उपलब्ध करण्यात आले आहे.यापैकी पहिले दहा प्लॉट वितरणासाठी उपलब्ध केले असून 23 डिसेंबर पासून 2024 ऑनलाईन ही अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे.ज्या उद्योजकांना हे प्लॉट घ्यायचे आहेत त्यांना ऑनलाईन अर्ज भरण्यात काही शिवसेना कार्यालयाशी संपर्क साधावा असे आव्हान चिवटे यांनी केले आहे.

——

हे दहा भूखंडाचे वाटप झाल्यानंतर 60 ते 70 भूखंड वाटपासाठी तयार असून तेही तात्काळ एक वर्षभरात सर्व उद्योजकांना देण्यात येतील.याशिवाय तात्पुरती पाणी पुरवठा योजना करण्यासाठी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी चार कोटी रुपये मंजूर केले असून याचेही काम लवकर सुरू होईल.एमआयडीसीच्या विभागीय संचालिका बिरजे यांनी दिली आहे
@@@@उद्योग मंत्री उदय सामंत यांनी गेली पंचवीस वर्षापासून रखडलेला करमाळा एमआयडीसी चा प्रश्न सोडवल्याबद्दलउद्योग मंत्री उदय सामंत यांचा सत्कार करण्यासाठी करमाळातील नव उद्योजकांची शिष्टमंडळ लवकरच मुंबईला जाऊनउद्योग मंत्री नामदार सावंत यांचा सत्कार करण्यात असल्याची माहिती उद्योजक फुलकुमार शहायांनी दिली आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group