Monday, April 21, 2025
Latest:
करमाळासकारात्मक

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद करमाळा यांच्यावतीने 375 फूट तिरंगी झेंडा रॅली संप्पन

करमाळा प्रतिनिधी भारत देश स्वांतत्र होऊन 75 वर्ष पूर्ण झाली व स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षांमध्ये भारत देश पदार्पण करत आहे . अखिल भारतीय विद्यार्थी परिषद करमाळा यांच्यावतीने 375 फूट तिरंगी झेंडा रॅलीचे आयोजन करमाळा शहरात करण्यात आले . या उपक्रमांमध्ये करमाळा शहरातील विविध शाळांनी सहभाग घेतला . यामध्ये अण्णासाहेब जगताप प्रशाला , कन्या प्रशाला या शाळांनी सहभाग नोंदवला या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये देश प्रेमाची भावना वाढावी व अमृत महोत्सवी वर्षापूर्वी आनंद उत्सव साजरा करण्याचा हेतू होता या कार्यक्रमासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रदेश संघटन मंत्री अभिजीत पाटील उपस्थित होते . तसेच या कार्यक्रमासाठी विविध सामाजिक क्षेत्रातील , राजकीय क्षेत्रातील व शैक्षणिक क्षेत्रातील लोकांनी सहभाग नोंदवला . या कार्यक्रमसाठी 1000 हुन अधिक विद्यार्थी व कार्यकर्तयानी सहभाग नोंदवला .
या कार्यक्रमां साठी पुणे विभाग संयोजक सौरभ शिंगाड़े , प्रदेश कार्यकारणी सदस्य शुभम बंडगर , करमाळा शहर मंत्री संकेत दयाल , संतोष कांबळे , जिल्ह्यासंयोजक पार्थ तेरकर , जिल्हासह संयोजक हितेश पुंज, सचिन पारवे , प्रदीप वाघमोडे , सौरभ सलगर , प्रताप आरकिले , संघर्ष दयाल , शुभम आदि कार्यकर्ते उपस्थित होते तसेच करमाळा शहरातील युवा नेते शंभूराजे जगताप , भाजप प्रदेश दीपक चव्हाण , भाजपा तालुकाध्यक्ष गणेश चिवटे , शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल , सुरज मस्के आदी मान्यवर उपस्थीत होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group