अहिल्यादेवीं होळकर यांचा आदर्श घेऊन देशातील राजकर्त्यांनी आदर्श कारभार करावा-आण्णासाहेब सुपनवर
करमाळा प्रतिनिधी अहिल्यादेवीं होळकर यांचा आदर्श घेऊन देशातील राजकर्त्यांनी आदर्श कारभार करावा त्यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून राज्यकारभार करावा असे मत बळीराजा शेतकरी संघटनेचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष श्री अण्णासाहेब सुपनवर यांनी व्यक्त केले. राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त अयोध्यानगर सुपनवरवस्ती येथे प्रतिमेचे पूजन करण्यात आले.या कार्यक्रमास खांबेवाडीचे ज्येष्ठ नेते श्री भगवानराव वायकुळे श्री ज्ञानेश्वर सुपनवर श्री रामभाऊ वाघमोडे बळीराजा शेतकरी संघटनेचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष श्री अण्णासाहेब सुपनवर महाराष्ट्र चॅम्पियन पै आदिनाथ उर्फ बाळराजे सुपनवर ओम खांडेकर दत्तात्रय सुपनवर आधी जण उपस्थित होते. यावेळी बोलताना भगवान वायकुळे म्हणाले की राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी हिंदुस्थानामध्ये तीस वर्ष आदर्श असा राजकारभार केला अहिल्यादेवी होळकर यांनी अनेक मंदिरांचे जीर्णोद्धार केले घाट बांधले विहिरी खोदल्या त्यांच्या राज्यामध्ये भिल्ल समाजाची लोक चोऱ्या करण्याचा व दरोडे करण्याचा प्रयत्न करत होते त्यांना भिल्ल समाजाला राज्यांमध्ये जमिनी कसण्यासाठी दिल्या समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले असुन अहिल्यादेवी होळकर यांनी लोकासाठी राज्य निर्माण केले असल्याचे सांगितले.
