Thursday, September 17, 2026
Latest:
करमाळा

बार्शीचे मा.आमदार राजाभाऊ राऊत यांना विधानपरिषदेवर संधी द्यावी – माजी आमदार जयवंतराव जगताप

करमाळा प्रतिनिधी बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी आपण जिल्ह्यातील एका शिष्टमंडळासह राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याची माहिती करमाळ्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी दिली . येत्या मे महिन्यात विधानसभा सदस्यांमधून निवडून द्यावयाच्या जवळपास नऊ जागा रिक्त होत आहेत .सोलापूर जिल्ह्याच्या समाजकारण व राजकारणात संघर्ष यात्री व विकासात्मक नेतृत्व म्हणून राजेंद्र राऊत यांच्याकडे पाहिले जाते. विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान काही अपप्रचारामुळे जरी दुर्दैवाने राऊत यांचा पराभव झाला असला तरी तेथील सुजाण जनतेने त्यानंतरच्या बाजार समिती, नगरपरिषद व जिल्हा परिषद -पंचायत समिती निवडणुकीमध्ये झालेली चूक दुरुस्त करीत राजेंद्र राऊत यांच्या नेतृत्वावर विश्वास दर्शविलेला आहे .सोलापूर जिल्ह्यातील सर्व समविचारी नेत्यांचे समन्वयक म्हणून राऊत यांची जिल्हाभरात ओळख आहे . त्यामुळे सार्वजनिक जीवनात काम करत असताना राऊत यांच्यासारखे नेतृत्व नाउमेद होऊ नये व त्यांना अधिक कार्यक्षमतेने काम करता यावे याकरिता मुख्यमंत्र्यांनी विधान परिषदे मधे रिक्त होणाऱ्या जागेवर राऊत यांना संधी द्यावी अशी मागणी आपण जिल्ह्यातील समविचारी नेत्यांच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्याकडे करणार असल्याची माहिती देखील माजी आमदार जगताप यांनी यावेळी दिली .

error: Don\'t try to copy. Content is protected !!