बहुजन मराठी पत्रकार संघ शाखा करमाळा च्या वतीने जेऊर येथे १०३ रक्तदात्यांना फळे वाटप.
प्रतिनिधी
बहुजन मराठी पत्रकार संघाच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षा सौ. आशाताई चांदणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला.
महात्मा फुले यांच्या १९६ व्या जयंती निमित्त सकल माळी समाज जेऊर ता. करमाळा यांचे तर्फे १०३ रक्तदात्यांचे रक्तदान केले. या १०३ रक्तदात्यांना बहुजन मराठी पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य शाखा करमाळा यांच्या वतीने फळे वाटप करण्यात आले, यावेळी बहुजन मराठी पत्रकार संघाचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष मा. श्री. बाळासाहेब भिसे सर, व बहुजन मराठी पत्रकार संघ सोलापूर जिल्हा सचिव मा. श्री. आबासाहेब झिंजाडे सर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन करुन रक्तदात्यांना फळे वाटप केले व रक्तदात्यांना संघाच्या वतीने शुभेच्छा दिल्या. यावेळी सकल माळी समाजाच्या वतीने बहुजन मराठी पत्रकार संघाचे श्री बाळासाहेब भिसे व आबासाहेब झिंजाडे यांच्या सन्मान केला.यावेळी उपस्थित जेऊर येथील काही मान्यवरांनी शिबिरास भेट दिली यामध्ये पै. पृथ्वीराज भैया पाटील ( युवा नेते) पै. अतुल भाऊ पाटील ( सभापती पं. स. करमाळा) अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद सोलापूर जिल्हा अध्यक्ष किशोर माळी साहेब,दिपक ढगे,(समता परिषद बार्शी ता.अध्यक्ष ) धनजंय शिरसकर, ( मा. उपसरपंच जेऊर)भास्कर भाऊ कांडेकर (मा.सरपंच ) राजुशेठ गादिया ( मा. सरपंच)राजाभाऊ जगताप ( मा. उपसरपंच) विनोद गरड,( ग्रा. पं. सदस्य)नितिन खटके संभाजी ब्रिगेड अध्यक्ष सोलापूर,व सकल माळी समाजाचे सर्व अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सर्व माळी समाज बांधवांनी व जेऊर परिसरातील नागरिकांनी सहकार्य केले,उपस्थीत सर्व मान्यवराना महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा भेट दिली.हा कार्यक्रम जेऊर येथील कर्मयोगी गोविंद बापु पाटील सभागृह येथे संपन्न झाला.
