मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी महाराष्ट्र बंदला करमाळयात शंभर टक्के प्रतिसाद
करमाळा प्रतिनिधी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे शासनाकडून काढलेल्या अध्यादेशाची तात्काळ अंमलबजावणी करावी या मागणीसाठी अंतरवली सराटी येथे मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे त्यांच्या या मागणीला समर्थनार्थ मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी उद्या 14 फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. या मागणीला सकल मराठा समाजाने पाठिंबा दिला असून याबाबत त्यांनी निवेदन दिले असून करमाळा शहर व तालुक्यामध्ये सर्व दुकानदार व्यापारी नागरिकांनी शंभर टक्के बंद पाळून मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे या मागणीचे समर्थन करत पाठिंबा दिला आहे . करमाळा शहर व तालुक्यातील सर्व समाज बांधवांनी शांततेत बंद पाळल्यामुळे सकल मराठा समाज करमाळा शहर व तालुका यांच्यावतीने सर्व समाजबांधवाचे आभार मानले असुन अशीच साथ देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
