गजानन सोशल ॲड स्पोर्ट्स क्लबच्या गणेश जयंती उत्सवाला सामाजिक एकात्मतेचे दर्शन महाप्रसादास लोटला सर्वधर्मियांचा जनसागर
करमाळा प्रतिनिधी सुखकर्ता तू दुखहर्ता मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया या गजराच्या निनादांमध्ये करमाळा शहरातील वेताळपेठ येथील गजानन स्पोर्ट्स अँड सोशल क्लबच्या वतीने गणेश जयंती उत्सव मोठ्या उत्साहात आनंदात संपन्न झाला. यंदाचे मंडळाचे चोविसावे वर्ष असून सर्व जाती धर्माचे लोक यामध्ये सहभागी होऊन गणेश जयंती एक आनंद उत्सव म्हणून साजरा करतात. हिंदू मुस्लिम एकात्मतेचे एकमेव उदाहरण गजानन सोशल क्लब आहे .यावर्षी कोरोनाचे सावट दूर झाल्याने गणेश जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याचे ध्येय ठेवून मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी यामध्ये सहभाग नोंदवत उत्सव आनंदात पार पाडला आहे. गणेश जयंती निमित्ताने सकाळी आठ ते एक या वेळेमध्ये गणेश याग सहस्त्र आवर्तन होमहवन श्री गणेशाची आरती करून त्यांना महाप्रसाद देऊन नागरिकांना महाप्रसाद देण्यात आला. करमाळा शहरातील नागरिकांनी यंदाची वर्षीही गजानन स्पोर्ट्स क्लबच्या महाप्रसादाचा उस्फूर्तपणे नागरिक महिला भगिनीं चिमुकल्याबरोबर जेष्ठ नागरिक मान्यवर मंडळीनी लाभ घेतला असुन या गणेश जयंतीचे वैशिष्ट्ये म्हणजे सर्व जाती धर्माच्या लोकांनी श्री गणेशाला वंदन करून या महाप्रसादाचा लाभ घेतला आहे .पाच ते साडे पाच हजार नागरिकांनी महाप्रसाद लाभ घेतला आहे. महिला भगिनींनी या उत्सवामध्ये आनंदात सहभागी होऊन महाप्रसादाचा लाभ घेतला असुन महिलांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. महाप्रसादाच्या व उत्सवाच्या कार्यामध्ये यंदाच्या वर्षी बाल गोपाळ यांनी विशेष सहभाग नोंदवला असून गजानन स्पोर्ट्स क्लबचे बाल सदस्यही या कार्यामध्ये सहभागी झाली होते गजानन सोशल स्पोर्टर्स क्लब परंपरा यशस्वीपणे चालवण्यासाठी पुढची पिढीही कामाला लागली हे बघून विशेष आनंद वाटत असल्याचे अध्यक्ष प्रशांत ढाळे यांनी सांगितले गजानन स्पोर्ट्स अँड सोशल क्लबच्या गणेश जयंती उत्सवामध्ये शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक राजकीय अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्री गणेशाची दर्शन घेऊन गजानन स्पोर्ट्स क्लबच्या उपक्रमाचे कौतुक करून महाप्रसादाचा लाभ घेतला आहे प्रशांत ढाळे यांनी गणेश जयंती उत्सव सुरू करून करमाळा शहरात भक्तीमय वातावरण निर्माण केले आहे सामाजिक एकमता जपण्यासाठी हे कार्य नक्कीच समाजाला दिशा देणारे असून त्यांच्या या कार्याची अनुकरण करून करमाळा शहरांमध्ये अनेक मंडळांनी गणेश जयंती उत्सव साजरा करून सामाजिक एकात्मतेचे दर्शन घडवले आहे.
