घारगाव ता. करमाळा येथे बीएसएनएल मोबाईल टॉवर मंजूर ___ किरण दादा पाटील यांच्या मागणीला यश
करमाळा तालुक्यातील घारगाव हे शेवटचे टोक घारगाव परिसरात आणि शेजारच्या गावामध्ये मोबाईल रेंजचा खूप मोठा प्रॉब्लेम होता, अनेकांची रेंज नसल्या कारणामुळे गैरसोय होत होती हा मोठा प्रॉब्लेम ओळखून किरण दादा पाटील यांनी सोलापूर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर साहेबांना तीन महिन्यापूर्वी भेटून मोबाईल टॉवरची घारगाव परिसर साठी मागणी केली होती त्यावरती योग्य ती कारवाई होऊन आज रोजी बीएसएनएल कार्यालयाचे अधिकारी व अर्जुनगर सर्कल् चे काझी साहेब व घारगाव चे तलाठी क्षीरसागर भाऊसाहेब मा, सरपंच किरण दादा पाटील, सरपंच राजेंद्र भोसले, युवा कार्यकर्ते काकासाहेब होगले यांनी स्थळ पाहणी केली आहे, लवकरच बीएसएनएल मोबाईल टॉवरचे काम सुरू होणार आहे त्यामुळे घारगाव, बोरगाव, संगोबा, पाडळी, तरटगाव ,बाळेवाडी, पोटेगाव, वाघाचीवाडी असे आजूबाजूच्या गावांना याचा फायदा होणार आहे असे किरण दादा पाटील यांनी सांगितले आहे.
