करमाळा विविध कार्यकारी सोसायटीवर सांवत गटाची एक हाती सत्ता करमाळा सोसायटी बिनविरोध
करमाळा प्रतिनिधी
करमाळा विविध कार्यकारी सहकारी सोसायटी या संस्थेची निवडणुक आमदार संजयमामा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व सावंत गटाचे नेते सुनील बापु सावंत यांच्या नेतॄत्वाखाली बिनविरोध झाली असुन यामध्ये सर्व साधारण गटातुन सुनील भगवान सावंत शिवराज जगताप,हरीभाऊ फंड, मनोज गोडसे, अशोक ढवळे,नागेश उबाळे,योगेश काकडे, उमेश हवालदार, महीला राखीव मधुन आरती चाॅदगुडे संगीता सुरवसे इ मां,व, मधुन संतोष बनकर,मागासवर्गीय प्रतिनिधी दासा मंडलीक एन, टी मधुन चंद्रकांत सामसे यांची बिनविरोध निवड झाली आहे.करमाळा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीसाठी निवडणुक निर्णय अधिकारी सौ,एस के मुंडे यांच्या कड़े एकुण सोळा अर्ज दाखल झाले होते त्यापैकी आज तीन उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतला त्यामुळे तेरा जागेसाठी तेरा अर्ज राहील्याने सहाय्यक निबंधक दिपक तिजोरे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुक निर्णय अधिकारी मुंडे यांनी आज बिनविरोध निवडीची घोषणा केली त्यांना करमाळा सोसायटी चे सचीव नवनाथ चौधरी यांचे सहकार्य लाभले.
ही निवडणुक बिनविरोध करण्यासाठी करमाळा नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष दादासाहेब सावंत पं,से सदस्य अँड राहुल सावंत आदी जणानी प्रयत्न केले.यावेळी सांवत गटाचे नेते सुनील बापु सावंत म्हणाले की या संस्थेची स्थापना कै,आण्णासाहेब जगताप यांनी केली होती ते संस्थापक चेअरमन होते आज करमाळा सोसायटी ची निवडणुक विरोधी गटाने उमेदवारी अर्ज न भरल्यामुळे बिनविरोध झाली यामुळे संस्थेचा खर्च वाचला त्यामुळे सर्व गटाचे प्रमुख व सभासदाचे आभार येणारे काळात सभासदाचा कुठलाही भेदभाव न करता कर्ज वाटप केले जाईल या संस्थेला उभारी देण्याकामी सर्व थकीत कर्जदारानी सहकार्य करावे व संस्था उभारणी साठी मदत करावी असे आवाहन त्यांनी केले.
