यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी
करमाळा प्रतिनिधी करमाळा- येथील विद्या विकास मंडळ संचलित यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार,भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, समाजसुधारक, महामानव, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त प्रतिमेस विद्या विकास मंडळाचे सचिव मा. विलासरावजी घुमरे सर यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल.बी.पाटील, उपप्राचार्य डॉ.अनिल साळुंखे, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य संभाजी किर्दाक,कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील प्राध्यापक, शिक्षेकतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनेउपस्थित होते.
