Saturday, April 26, 2025
Latest:
Uncategorized

चिखलठाण येथे धडाडणार राम सातपुते यांची तोफ आदिनाथ निवडणुकीच्या निमित्ताने आज प्रचार सभा…


करमाळा प्रतिनिधी
आदिनाथ सहकारी साखर कारखाना निवडणुकीनिमित्त प्रचार आता शिगेला पोहोचला असून प्रचारासाठी महायुती व महाविकास आघाडी कडून स्टार प्रचारक निवडणूक रिंगणामध्ये उतरविले जात आहेत. महायुती आदिनाथ बचाव पॅनलच्या आज चिखलठाण नं.१ येथे सायंकाळी ७.०० वाजता होणाऱ्या प्रचार सभेसाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे निकटवर्तीय माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार रामजी सातपुते हे आवर्जून उपस्थित राहणार असून अकलूजकरांवरती ते कोणती तोफ डागणार याची उत्सुकता करमाळा तालुक्यातील सभासदांना आता लागलेली आहे.
आदिनाथच्या प्रचारामध्ये महायुती आदिनाथ बचाव पॅनलने आघाडी घेतली असून आता शेवटच्या टप्प्यात निर्णायक अवस्थेमध्ये स्टार प्रचारक म्हणून राम सातपुते आज चिखलठाण एक येथे येणार आहेत.या प्रचार सभेसाठी माजी आमदार संजयमामा शिंदे हे प्रमुख उपस्थितीत असणार आहेत. त्यांच्याबरोबरच बारामती ऍग्रो चे व्हॉइस चेअरमन सुभाष गुळवे तसेच भाजपाचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे ,शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे हे उपस्थित राहणार आहेत. सदर सभेसाठी मोठ्या संख्येने चिखलठाण नंबर एक येथे उपस्थित रहावे असे आवाहन जेऊर ऊस उत्पादक गटाचे उमेदवार चंद्रकांत काका सरडे यांनी केले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group