मंत्रालयाच्या बाहेर ट्राफीक पोलिसांकडुन होतोय मुंबई बाहेरच्या जनतेवर अन्याय*- ॲड. अजित विघ्ने यांनी केला ट्राफीक पोलिस आणि सरकारचा निषेध…
मुंबई वार्ता
– मुंबईत मंत्रालयाच्या बाहेर गाड्यांना पार्किंग करणे अतिशय जोखमीचे काम असुन, दिनांक-१५/१२/२०२२ रोजी मंत्रालयाचे बाहेर ट्राफीक पोलिस हे मुंबई बाहेरच्या जिल्ह्यातील गाड्याचे पासिंग शोधुन गाड्यांवर अमानुषपणे दंड आकारणी करताना दिसत आहे.. या ठिकाणी बेकायदेशीरपणे एका गाडीवर एक एक हजार रुपये दंड आकारला जातोय.. हे लोक दंडाची आकारणी कशी केली हे विचारले असता, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारा असे सांगतात.. येथे दिवसभरात लाखो रुपये बेकायदेशीर पणे उकळले जात असुन, याबाबत नागरिक संतप्त झाले आहेत.. आजही सोलापुर, संगमनेर, वसमत व अन्य ठिकाणचे सर्व सामान्य नागरिकांचे गाड्यावर विनाकारण दंडाची आकारणी केली असुन याबाबत करमाळा.सोलापुरचे ॲड. अजित विघ्ने व इतर मंडळींनी याबाबीकडे लक्ष वेधण्यासाठी सरकार व ट्राफीक पोलिसांचा निषेध व्यक्त केला असुन, याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचेकडे तक्रार देखिल केली आहे.यावेळी ॲड. एम.डी. कांबळे, विकास जरांडे, योगेश शिंपी व ग्रामस्थ उपस्थित होते.
