करमाळा तालुका साहित्य मंडळ,करमाळा यांच्या वतीने २५ डिसेंबर रोजी बुधभुषण पुरस्कार सोहळा कवी संमेलन…
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुका साहित्य मंडळ,करमाळा यांच्या वतीने दिला जाणारा २०२१-२०२२ चा “बूधभूषण काव्य पुरस्कार” कवी पुनीत मातकर यांच्या ”ऐन विणीच्या हंगामात” या काव्यसंग्रहास देण्यात येणार आहे.हा सोहळा रविवार, दिनांक २५/१२/२०२२ रोजी यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा येथे संपन्न होणार आहे.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल.बी.पाटील, प्रमुख पाहुणे संगीतकार/ सिनेपार्श्वगायक/लोककवी प्रशांत मोरे तर सुप्रसिद्ध कवी प्रा.डॉ. सुरेश शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे.
या कार्यक्रमात दि. २५/१२/२०२२ रोजी सकाळी ९:३० ते ११:०० “ग्रंथ दिंडी” काढण्यात येणार आहे. त्यानंतर करमाळा तालुका साहित्य मंडळ आणि यशवंतराव चव्हाण महाविद्यालया यांच्या संयुक्त विद्यमाने ११:०० ते १:०० “गझल मुशायरा व स्थानिक आणि महाविद्यालयीन कवी-कवयित्री यांचे कवी संमेलन पार पडणार आहे.
दुपारी १:०० ते २:०० यावेळेत स्नेह भोजन होईल. यानंतर सायंकाळी ठीक ५:०० वा. “बूधभूषण काव्य पुरस्कार” वितरण सोहळा पार पडणार असुन या सोहळ्यास काव्य रसिक आणि साहित्यप्रेमींनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन करमाळा तालुका साहित्य मंडळाचे अध्यक्ष कवी प्रकाश (तात्या) लावंड, उपाध्यक्ष प्रा. नागेश माने, सचिव दीपक लांडगे, प्रसिद्धी प्रमुख कवी खलील शेख, सल्लागार विवेक येवले, खजिनदार डॉ.सौ.सुनिता दोशी, गझलकार नवनाथ खरात, सदस्य कवी दादासाहेब पिसे (माळी) यांनी केले आहे.
