शिवशंभो कुस्ती संकुल जेऊरवाडी येथील मल्लांचे जिल्हास्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
करमाळा प्रतिनिधी
खडूस, तालुका माळशिरस येथे १० नोव्हेंबर रोजी झालेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत जेऊरवाडी येथील शिवशंभो कुस्ती संकुल मधील मुलांनी चार सुवर्ण व एक रौप्य पदक मिळवून घवघवीत यश प्राप्त केले आहे.
1] उत्कर्ष भिसे-48 किलो वजनी गटात 14 वर्षखालील सुवर्णपदक
2] सुजित हजारे -५५ किलो वजनी गटात 17 वर्षाखालील सुवर्णपदक
3] किरण मुटेकर- 71 किलो वजनी गटात 17 वर्षाखालील सुवर्णपदक
4] संकेत शिंदे -८२ किलो वजनी गटात 19 वर्षाखालील सुवर्णपदक
5] पृथ्वीराज घोगरे -71 किलो वजनी गटात 17 वर्षाखालील रौप्य पदक मिळाले
या मल्लांना महाराष्ट्र केसरी चंद्रहास (बापू )निमगिरे व वस्ताद श्रावण कळेल यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आणि तुळशीदास निमगिरे, अण्णासाहेब निमगिरे ,सोमनाथ हाजारे,किसन करचे, नितीन निमगिरे, दीपक निमगिरे ,गणेश मुटेकर यांचे सहकार्य लाभले. शिवशंभो कुस्ती संकुलात 50 मल्ल रोज सकाळी आणि संध्याकाळी त्यांचं सराव घेऊन त्यांना योग्य ते मार्गदर्शन करतो. अत्याधुनिक पद्धतीची व्यायाम शाळा असून मॅट व मातीचा आखाडा आहे आणि राहण्याची सोय मोफत केली जाते मी हालाकीच्या परिस्थितीतून महाराष्ट्र केसरी झालो त्याची जाणीव ठेवून गरीब मुलांना मार्गदर्शन व इतर मदतही करत आहे. पै.चंद्रहास निमगिरे
महाराष्ट्र केसरी संस्थापक अध्यक्ष शिवशंभो कुस्ती संकुल जेऊरवाडी
