Wednesday, January 1, 2025
Latest:
करमाळा

भारतीय जनता पार्टी सोलापूर पश्चिमच्या जिल्हा चिटणीसपदी विनोद महानवर यांची निवड

करमाळा प्रतिनिधी भारतीय जनता पार्टी सोलापूर पश्चिमच्या जिल्हा चिटणीसपदी विनोद महानवर यांची निवड जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी जाहीर केली याबाबत त्यांना नियुक्तीचे पत्र टेंभुर्णी येथे झालेल्या सदस्यता नोंदणी अभियान कार्यशाळे वेळी देण्यात आले
यावेळी जिल्हा सरचिटणीस. सचिन शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत पवार ,माढा तालुकाध्यक्ष योगेश पाटील, संजय अण्णा घोरपडे, बाळासाहेब कुंभार ,नरेंद्रसिंह ठाकुर, सचिन चव्हाण, जितेश कटारिया, नितीन कांबळे, करमाळा महिला आघाडीच्या शहराध्यक्ष रेणुका राऊत आधी जण उपस्थित होते
यावेळी जिल्हाध्यक्ष श्री चेतनसिंह केदार सावंत म्हणाले की भाजपा सदस्य नोंदणी बाबत सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी गावोगावी घरोघरी जाऊन प्रवास करून भाजपाचे सदस्य करावेत
आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये या नोंदणीचा निश्चितच आपल्याला फायदा होईल. भाजपाकडे लोक अपेक्षेने पाहत आहेत निश्चितच मागील वेळेप्रमाणेही यावेळी विक्रमी नोंदणी जिल्ह्यातून झाल्याशिवाय राहणार नाही असेही मत त्यांनी व्यक्त केले यावेळी श्री महानवर म्हणाले की भाजपाचे संघटनात्मक काम वाढविण्यासाठी आपण निश्चितच मोठ्या प्रमाणात सभासद नोंदणी करू असे अभिवचन त्यांनी दिले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!