करमाळा येथील ग्लोबल इन्स्टिट्यूटचे संचालक प्रा.महेश निकत यांना नवीन वर्षातील नालंदा ऑर्गनायझेशनचा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर*
करमाळा प्रतिनिधी
लोककल्याणासाठी सदैव तत्पर असलेले व कला आणि विद्याशिक्षण क्रांतीचा केंद्रबिंदू असलेल्या नालंदा ऑर्गनायझेशन, महाराष्ट्र राज्य आयोजित आदर्श गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रा.महेश निकत सर यांना नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी जाहीर करण्यात आला.समाज, संस्कृती, यांचे संवर्धन व लोकशाही विचारांना एकत्र करणारा आणि जगण्याला ध्येय बनवणाऱ्या ऐतिहासिक गुणवत्तेचा सर्वश्रेष्ठ सन्मान सोहळा पुणे येथे होत असून, प्रा . निकत सर यांचा कार्य गौरवार्थ नालंदा गौरव पुरस्कार २०२४ देऊन आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहेत. प्रा निकत यांचा आतापर्यंत चा हा 6 वा पुरस्कार असून या सर्व पुरस्कार मुळे पुढील काळात विद्यार्थी व सामाजिक कार्यात आणखी खूप काम करण्याची प्रेरणा मिळत असून पुढील काळात असे अनेक पुरस्कार मिळवण्यासाठी प्रामाणिक कष्ट व प्रयत्न करीत राहील. असे सांगितले आहे.
