करमाळा शहरातील गणेश मंडळ कार्यकर्त भक्ताना महाप्रसाद देऊन मानवता धर्म पाळणारी सिंधी समाजाची भक्ती
करमाळा प्रतिनिधी मानवता हाच खरा धर्म असून सिंधी समाजाने ही पंरपंरा जपली आहे. करमाळा शहरातील सिंधी समाज दरवर्षी सर्व गणेश भक्तांना गणेश विसर्जना दिवशी महाप्रसादाची वाटप करत असुन गुरूनानकाची शिकवण लंगर सेवा करून माणुसकी धर्माची शिकवण समाजाला दिली आहे. शहरात गणेश उत्सव मोठ्या उत्साहात आनंदात सादर केला जातो.गणेशोत्सव मंडळातील कार्यकर्त भाविक भक्त गणेशाच्या भक्तीत लीन होऊन यामध्ये मोठ्या संख्येंने सहभागी होऊन गणेशाचे भक्तीभावाने वंदन करीत असतात .अशा सर्व गणेश भक्तांना सिंधी समाजाच्या वतीने पुरी भाजी, महाप्रसाद देण्यात आला.यावेळी सिंधी समाजाचे जेष्ठ कार्यकर्त पप्पु सिंधी,चेतन किंगर,महेश किंगर संदीप चुंग, गोलु सिंधी,अमित चुंग,संजित चुंग, सिध्दार्थ बदलानी, प्रेम चुंग यांच्या हस्ते महाप्रसाद देण्यात आला. गुरुनानक जयंती निमित्ताने संपूर्ण करमाळा शहराला दरवर्षी महाप्रसाद वाटप करण्यात येते. सामाजिक धार्मिक कार्यात सिंधी समाजाचे योगदान मोलाचे आहे. सिंधी समाजाकडुन महाप्रसाद दिल्याबद्दल गणेश भक्तानी कौतुक करून आभार व्यक्त केले आहे.


