Wednesday, April 23, 2025
Latest:
करमाळा

आमदार संजयमामा शिंदे यांनी केत्तुर नं-१व २ करीता विकास निधी दिल्यामुळे विकासाला चालना मिळाली आमची वाढीव निधीची मागणी देखिल मंजुर होईल -माजी सरपंच देवराव नवले

*
करमाळा प्रतिनिधी- रविवार दिनांक१/१०/२०२३ रोजी केत्तुर नं-२ ता- करमाळा येथील भैरवनाथ मंदीराचे समोर आमदार संजयमामा शिंदे यांचे आमदार निधीतुन होणाऱ्या सभामंडपाचे भुमीपुजन ज्येष्ठ नेते दादासाहेब निकम व मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. याप्रसंगी केत्तुरचे माजी सरपंच ॲड. अजित विघ्ने, मान. तुकाराम खाटमोडे( तात्या), माजी सरपंच उदयसिंह पाटील, रावसाहेब चव्हण, किशोर वेळेकर, प्रविणशेठ नवले, यांचेसह ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी बोलताना केत्तुरचे माजी सरपंच देवराव नवले यांनी सांगितले की, आमदार संजयमामा शिंदे यांना त्यांचे टर्म मधे पहील्यांदा कोव्हीड आणि सरकार मधे फेरबदल यामुळे विकासकामे होताना अडथळे येत होते, परंतु अशातही मामांनी पश्चिम भागातला महत्वाचा डिकसळ पुल मंजुरी, टेंडर झालेला पोमलवाडी ते सावडी प्रजिमा-१२४ रस्त्याला निधी मंजुर केला आहे. तसेच २५/१५ अंतर्गत प्रत्येक गावाला विकास निधी देताना केत्तुर नं-१ ला २० लक्ष आणि केत्तुर नं-२ ला २० लक्ष निधी दिला आहे, तसेच यापुर्वी देखिल सभामंडप, रस्त्याकरीता व पुनर्वसन चा निधी दिला आहे , जलजीवन योजनेतुन दोन्ही गावांना योजना दिली आहे. याशिवाय लवकरच केत्तुर नं-२ ते केतुर नं-१ मार्गे वाशिंबे हा रस्ता HAAM हॅम या योजनेतुन होणार आहे. त्यामुळे याबद्दल आमदार साहेबांचे आभार व्यक्त केले असुन, याशिवाय नागरी सुविधा अंतर्गत व इतर योजना मधुन निधीची मागणी केली आहे. या कार्यक्रमाचे नियोजन माजी उपसरपंच प्रशांत नवले यांनी केले .

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group