Monday, April 21, 2025
Latest:
करमाळासहकार

मकाई पूर्ण ताकदीनिशी गाळप करणार-अ‍ॅड. ज्ञानदेव देवकर आज मोळी पूजनाचा कार्यक्रम संपन्न

करमाळा प्रतिनिधी.                                        *श्री.मकाई सहकारी साखर कारखाना यंदा पूर्ण क्षमतेने चालवून जास्तीत जास्त गाळप करणार असल्याचे चालू ऊस गळीत हंगाम मोठा आहे. कारखाना कार्यक्षेत्रात ऊसाचे प्रमाण जास्त आहे.  कारखाना मोळी पूजना वेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन अ‍ॅड. ज्ञानदेव देवकर यांनी सांगितले. मकाईचा मोळी पूजन कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी कारखान्याचे ज्येष्ठ संचालक बाळासाहेब पांढरे आणि संचालक संतोष देशमुख यांचे शुभहस्ते गव्हाण    पूजन झाले.                                                    मकाई साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष स्व. दिगंबररावजी बागल (मामा) यांचे पुतळ्याचे पूजन कारखान्याचे माजी संचालक मोहन गुळवे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी सत्यनारायण पूजा संचालक दत्तात्रय गायकवाड आणि त्यांच्या सुविद्य पत्नी यांच्या हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन बाळासाहेब पांढरे, संचालक महादेव गुंजाळ, नंदकिशोर भोसले, गोकुळ नलवडे, संतोष देशमुख, बाळासाहेब सरडे, महादेव सरडे, सुनील शिंदे, रामचंद्र हाके, धर्मराज नाळे, नितीन राख, बापू कदम, रघुनाथ फरतडे, राणी लोखंडे, संतोष पाटील दत्तात्रय गायकवाड, कार्यकारी संचालक हरिश्चंद्र खाटमोडे, सभासदांमध्ये अजित झांजुर्णे, प्रशांत दिवेकर, मोहन खाटमोडे, दादासाहेब डोंगरे, विष्णू जाधव, रेवन्नाथ निकत, गणेश झोळ, सुयोग झोळ, रणजित शिंदे, विलास काटे, बापूराव शिंदे, सोनाज काळे, अजिनाथ पांढरमिसे, कारखान्याचे सर्व अधिकारी, कर्मचारी, सभासद वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.                      आज मोळी पूजनाचा कार्यक्रम पार पडला. यंदाचा गळीत हंगाम यशस्वीपणे पार पाडणार आहोत. कारखान्याचे साडेतीन लाख ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट आहे. कारखान्याच्या असावणी प्रकल्पाच्या माध्यमातून ७५ लाख स्पीरीटचे उत्पादनाचे उद्दिष्ट आहे. कारखाना कार्यक्षेत्रात ऊसाचे प्रमाण जास्त असले तरी सभासदांचा ऊस मागे ठेवणार नाही. इतर कारखान्यासोबतच मकाईची एफआरपी देऊ… बाळासाहेब पांढरे, माजी व्हाईस चेअरमन, मकाई सहकारी साखर कारखाना.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group