करमाळा येथे भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष गणेश चिवटे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कुस्ती स्पर्धेत किरण भगत विजयी,
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथे भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष गणेश चिवटे यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी दिनांक 30/10/2022 रोजी भव्य कुस्ती स्पर्धा पार पडल्या,
या कुस्ती स्पर्धेत उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत यांने पंजाबच्या रोहित चौधरी वर मात करत विजय मिळवला,या कुस्ती स्पर्धेत लहान गटातील मुलांच्या दोनशे रुपये पासून मोठ्या गटाच्या दोन लाख रुपयांच्या दोनशे कुस्त्या घेण्यात आल्या,
या कुस्ती स्पर्धेला माढा लोकसभेचे खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर ,अहमदनगर चे खासदार सुजयजी विखे ,अक्कलकोट विधानसभेचे आमदार भाजपा जिल्हाध्यक्ष सचिन दादा कल्याणशेट्टी, शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत, मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे, नगराध्यक्ष वैभव जगताप, युवा नेते पृथ्वीराज भैय्या पाटील, नेचर डिलाईल डेअरीचे मयूर जमादार तसेच राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते,
या कुस्ती स्पर्धा ह्या करमाळा तालुक्यातील पैलवानांना प्रोत्साहन देण्यासाठी व युवकांनी व्यसनापासून दूर राहून स्वतःच्या शरीराकडे लक्ष वेधून घेत कुस्ती मल्लविद्याचे शिक्षण घ्यावे यासाठी या कुस्ती स्पर्धेचे
आयोजन केले होते असे महाराष्ट्र चॅम्पियन अफसर जाधव यांनी सांगितले,
या कुस्ती स्पर्धेसाठी भाजपा तालुका उपाध्यक्ष रामभाऊ ढाणे, काकासाहेब सरडे, मोहन शिंदे, डॉ अभिजीत मुरूमकर, शिवराज चिवटे, जयराज चिवटे तसेच भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमासाठी तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते, या कुस्ती स्पर्धेसाठी कुस्ती प्रेमींनी मोठ्या प्रमाणात मैदानावर गर्दी केली होती,