कोर्टी परिसरात अतिवृष्टीने पिकाचे नुकसान त्वरीत पंचनामे करण्याची मागणी
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील कोर्टी या गावामध्ये पाऊसाच्या अतिवृष्टीमुळे कांदा सुर्यफुल, मका, सुर्यफुल, तुर या पिकाचे नुकसान झाले आहे यामध्ये प्रामुख्याने कोर्टी व परिसरातील गोरेवाडी हुलगेवाडी कुस्करवाडी या भागामध्ये अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झाले असल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अवकृपेने गेला असुन अतिवृष्टिचा फटका बसला असुन प्रशासनाने ताबडतोब पंचनामे करावे या संकटात असणाऱ्या शेतकऱ्याला न्याय द्यावा अशी मागणी कृषी उत्पन बाजार समितीचे संचालक अमोल झाकणे कोर्टीचे युवा नेते आशिष भैय्या गायकवाड यांनी केली आहे.त्वरित पिकांचे पंचनामे न केल्यास आदोलंन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
