महाराष्ट्र शासनाने मंगल कार्यालयाबाबत लावलेले निर्बंधात बदल करण्याची मागणी करमाळा तालुक्यात मंगल कार्यालय असोसिएशनची स्थापना
करमाळा प्रतिनिधी कोरोना निर्बंधांत बदल करावेत यासाठी करमाळा तालुका मंगल कार्यालय असोसिएशनची स्थापना करण्यात आली असून निर्बंधांत बदल करावेत अशी मागणी करण्यात आली आहे. शासनाने 23 डिसेंबर 2021 पासून लग्नासाठी मंगल कार्यालयाला 50 लोकांची उपस्थिती ठेवण्याचा निर्बंध लावलेले आहेत, त्याची मर्यादा 200 लोकांपर्यंत करावी अशा मागण्यांसाठीचे निवेदन करमाळ्याचे तहसीलदार समीर माने यांना देण्यात आले, यावेळी अध्यक्ष विनोद चव्हाण, मार्गदर्शक विलासराव घुमरे सर ,सेक्रेटरी बाळासाहेब होसिंग उपस्थित होते.करमाळा तालुका मंगल कार्यालय असोसिएशनची स्थापना करण्यात आली असून अध्यक्षपदी विनोद चव्हाण तर सेक्रेटरी पदी बाळासाहेब होसिंग यांची निवड करण्यात आली आहे.
