यशकल्याणी परिवाराचे संस्थापक अध्यक्ष प्रा.गणेश करे-पाटील यांची राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ संचलित राष्ट्रीय विश्वगामी माध्यमिक शिक्षक संघाच्या महाराष्ट्र राज्य सल्लागार पदी निवड
करमाळा/ प्रतिनीधी
यशकल्याणी परिवाराचे संस्थापक अध्यक्ष प्रा.गणेश करे-पाटील यांची राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ संचलित राष्ट्रीय विश्वगामी माध्यमिक शिक्षक संघाच्या महाराष्ट्र राज्य सल्लागार पदी निवड करण्यात आली आहे. यशकल्याणी परिवाराचे अध्यक्ष म्हणून काम करत असताना महाराष्ट्रातील शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल करे-पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.महाराष्ट्रातील शिक्षक बाधवांना व समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी,सेवा करण्यासाठी प्रा.करे-पाटील यांची निवड केल्याची घोषणा राष्ट्रीय विश्वगामी माध्यमिक शिक्षक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री.संतोष निकम व प्रदेशाध्यक्ष बापूसाहेब आडसूळ सरांनी केली आहे.
करे-पाटील यांनी या निवडीने आपण शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात अधिकाधिक सक्रीय होऊन शिक्षक संघाने दिलेली नवी जबाबदारी प्रामाणिकपणे व समर्थपणे पार पाडु असे अभिवचन दिले आहे.
यावेळेस राष्ट्रीय विश्वगामी माध्यमिक शिक्षक संघाचे श्री.दत्तात्रय ननवरे सर,श्री.हरिश्चंद्र गाडेकर,अजिनाथ कांबळे,मोहन अहिवळे,संजय मुळे,महादेव पवार,लोंढे,नवनाथ मोहोळकर सर तसेच सर्व पदाधिकारी व सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते.
