माजी आमदार नारायण पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम दिनांक 22 व 23 रोजी जेऊर येथे कर्मयोगी व्याख्यानमाला न्यायमूर्ती कोळसे-पाटील व पत्रकार संजय आवटे यांचे व्याख्यान
करमाळा प्रतिनिधी
लोकनेते माजी आमदार नारायण पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गेली 14 वर्षे जेऊर ता.करमाळा येथील भारत महाविद्यालयाच्यावतीने आयोजित केली जाणारी कर्मयोगी व्याख्यानमाला दि.22 व 23 ऑगस्ट या दोन दिवशी संपन्न होत आहे. या व्याख्यानमालेमध्ये *गुरुवार दिनांक 22 ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता प्रख्यात वक्ते व दैनिक लोकमतचे संपादक मा. संजय आवटे यांचे ‘ महाराष्ट्राचा नाद नाय करायचा ‘ या विषयावर* व्याख्यान संपन्न होणार आहे.
शुक्रवार *दि. 23 ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता थोर विचारवंत व मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी.जी.कोळसे पाटील यांचे ‘भारतीय संविधान व आजचे वास्तव’ या विषयावर* व्याख्यान संपन्न होणार आहे. 23 ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानास व माजी आमदार नारायण पाटील यांच्या वाढदिवसाच्या *समारंभास माढा लोकसभेचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील, कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार, विधानपरिषदेचे आमदार रणजीतसिंह मोहिते-पाटील हे महाराष्ट्रातील तीन महत्त्वाचे युवानेते* उपस्थित राहणार आहेत. शिव-शाहू, फुले- आंबेडकरांच्या पुरोगामी विचारधारेला पुढे घेऊन जाणाऱ्या व परिवर्तनवादी विचारांना बळ देणाऱ्या या व्याख्यानमालेतील दोन्ही व्याख्यानांसाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन या व्याख्यानमालेचे प्रमुख प्रा.डॉ.संजय चौधरी व भारत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अनंत शिंगाडे यांनी केले आहे.
