Tuesday, April 22, 2025
Latest:
करमाळाराजकीय

बागल गट एक कुटुंब असुन या गटातील सदस्य कुठेही गेला तरी तो पुन्हा स्वगृही परतणार -दिग्विजय बागल

करमाळा प्रतिनिधी बागल गट एक कुटुंब असुन या गटातील सदस्य कुठेही गेला तरी तो पुन्हा स्वगृही परतरणार असे मत बागल गटाचे युवा नेते मकाईचे चेअरमन दिग्विजय बागल यांनी व्यक्त केले.
सालसे येथील युवकांनी पुन्हा बागल गटात नव्याने प्रवेश केला.त्यावेळी बागल बोलत होते.पुढे बोलताना ते म्हणाले की सर्वसामान्य जनता बागल गटाच्या पाठीशी खंबीरपणे उभी असुन स्व. दिंगबरराव बागल मामा यांची पुण्याई असल्यामुळे बागल कार्यकर्ता कुठेही गेला तरी बागल गटाशी बांधिलकी कायम असल्याने तो पुन्हा इतरांचा अनुभव घेऊन स्वगृही येत आहेत. . सालसे येथील तरुण कार्यकर्त्यांनी जुने बागल गटाचे असणारे परंतु काही काळासाठी शिंदे गट, पाटील गटात गेलेल्या शिवाजी पन्हाळकर, गोरख पवळ, दिनेश शिंदे ,पिंटु सालगुडे ,विनोद सालगुडे, भाऊ पवळ आदिनाथ कदम, हरी शिंदे ,धनंजय सालगुडे, दशरथ पवार, सुहास सालगुडे ,शंकर काळे, दत्ता पन्हाळकर, बाबासाहेब कदम ,नवनाथ पवार, विलास काळे, यांनी बागल गटात प्रवेश केला आहे. यावेळी मकाईचे चेअरमन दिग्विजय बागल यांच्या हस्ते फेटा बांधून त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी आदिनाध साखर कारखान्याचे संचालक अविनाश वळेेकर बागल गटाचे जेष्ठ कार्यकर्ते छगन नरसाळे, पांडुरंग साळुंके, राजाभाऊ पवार, विलास भोरे, सुरेंद्र गोरे उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group