घरोघरी झाले पारंपारिक पद्धतीने गौराईचे आगमन
घारगाव प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील पूर्व भागामध्ये गौरीचे ही आगमन पारंपारिक पद्धतीने करण्यात आले.घारगाव मध्ये देखील गणरायाच्या पाठोपाठ गौरीचे देखील आगमन घरासमोर सडा रांगोळी करून घर स्वच्छ व सुंदर करण्यात आले तुळशी वृंदावना पाशी धान्याच्या राशीत गौरीला मांडून तिचे तुळशी वृंदावनापासून घरात आगमन करण्यात आले यावेळी महिलांनी हळदीकुंकू लावून गौरीचे स्वागत केले गौरीसाठी घरात विशेष असे सजावट करून गौरीला गणरायासह विराजमान केले गौरीच्या समोर विविध प्रकारच्या खेळणी देखावे मांडण्यात आले.
गौरी हा सन तीन दिवसाचा असतो तो घरोघरी उत्साहात व जल्लोषात साजरा केला जातो पहिल्या दिवशी गौरीचे आगमन दुसऱ्या दिवशी गौरीचे भोजन तर तिसऱ्या दिवशी गौरीचे विसर्जन असते.
