उजनी लाभक्षेत्राला पावसाने झोडपून काढले शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण
केत्तूर (अभय माने) करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील उजनी पांणलोट पट्ट्यात आज रविवार (ता. 4) रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास परतीच्या पावसाने झोडपून काढले.अचानक जोरदार पावसामुळे शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांची मात्र तारांबळ झाली.
तालुक्याच्या पश्चिम भागातील केतुरसह पारेवाडी वाशिंबे पोमलवाडी हिंगणी गुरमोहरवाडी कात्रज टाकळी रामवाडी परिसरात ढगाळ वातावरणामुळे अंधार पडल्यासारखी झाली होती प्रथमच ढगांचा गडगडात व विजांच्या पावसाला सुरुवात झाली अर्ध्या तासांच्या ब्रेकनंतर पुन्हा एकदा जोरदार पावसाने सुरुवात केली हा पाऊस सुमारे तासभर होत होता.
पावसाळा संपत आला तरी दमदार पाऊस होत नव्हता त्यामुळे शेतकरी चिंतेत होता तालुक्यातील पाझर तलावातही म्हणावा असा पाणीसाठा अद्यापही झाला नाही गेल्या काही वर्षापासून गणपती काळात समाधानकारक पाऊस होत असल्याने यावर्षीही त्याचा प्रत्यय आला.दरम्यान ढगाळ वातावरण कायम असल्याने रात्री पाऊस होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.गौरी पूजनाच्या दिवशी पाऊस आल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.या पावसाने सखल भागातून पाणी वाहिले तर बहुतेक ठिकाणी डबकी तयार झाली होती.तर तालुक्यातील रेल्वेचे भुयारी मार्ग बहुतांश ठिकाणी काम अद्यापही अर्धवट असल्याने या भुयारी मार्गात तीन ते चार फूट पाणी साचून राहिले होते.त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होते.
