पांडुरंगाच्या एकादशीला भाविकांना अन्नदान करण्यासाठी झटणारा अवलिया सच्चा कार्यकर्ता – तेजस सुरवसे
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथे कमलादेवी रोड बायपास चौक येथे दर एकादशीला वारकऱी व भाविक भक्ताना साबुदाणा खिचडी फळाचे वाटप करण्यात येते श्री देवीचामाळ येथील तेजेस सुरवसे या तरुण युवकांचे भाविकांना अन्नदान करण्यासाठीचे कार्य अखंडपणे चालु आहे.निस्वार्थ भावनेतुन कुठलाही स्वार्थ भावना न ठेवता केवळ लोकांची सेवा करणे हाच उद्देश बाळगुन मानवता हाच खरा धर्म म्हणुन तेजेश सुरवसे काम करत आहे.मागिल काही वर्षापासुन खंडोबा मंदीर परिसरात वृक्षारोपण करून हजारो झाडे लावुन हा परिसर झाडांच्या लागवडीने हा परिसर बहरला असुन नंदनवन करण्याचे काम केले आहे.या वृक्ष लागवड व त्याची जोपासणा करण्यासाठी श्री बाळासाहेब आबा देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले आहे. सध्याच्या युगात प्रत्येकजण पैशाच्या नावाच्या मागे लागला असुन अशा परिस्थितीत आपल्या कुटुंबाचा विचार न करता निरपेक्षपणे समाजकार्याला स्वतःला वाहुन घेऊन समाजसेवेचे व्रत जपण्याचे कार्य नक्कीच कौतुकास्पद असुन समाजकार्य करणाऱ्यासाठी एक आदर्श घेण्यासारखे तेजस सुरवसे यांचे कार्य प्रेरणादायी आहे.एकादशीला फराळ खिचडी वाटपांचे अन्नदान करण्यासाठी माऊली देवस्थान ट्रस्टचे ह.भ.प. बाबासाहेब साबळे महाराज,ह.भ.प पांडुरंग तात्या सुर्यवंशी यांचे मार्गदर्शन लाभत असुन अन्नदानाचा हा जग्गनाथ रथ अखंडपणे चालु असुन या उपक्रमास ज्ञात अज्ञात दात्यांचे सहकार्य लाभले असुन त्यांच्या सहकार्यातुन हे कार्य चालु असल्याचे तेजेस सुरवसे यांनी सांगितले आहे.
