Thursday, April 17, 2025
Latest:
करमाळाराजकीय

माजी आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली करमाळा तालुक्यावर भगवा फडकवण्याचा निर्धार शिवसेना कार्यकारिणीच्या निवडीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन

 

करमाळा प्रतिनिधी: जिल्हा परिषद, समिती पंचायत समिती व नगरपालिका निवडणुका माजी आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली लढून पुन्हा करमाळा तालुक्यावर भगवा झेंडा फडकवण्याचा निर्धार शिवसैनिकांनी केला आहे, असे म्हणत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारावर वाटचाल करणाऱ्या शिवसेनेचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा तालुका शिवसेना कार्यकारिणीची निवड करण्यात येणार आहे. इच्छुकांनी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन शिवसेनेचे महेश चिवटे यांनी केले आहे.
रविवार (ता. 24) सायंकाळी ५ वाजता शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष कार्यालय येथे ही बैठक होणार आहे. यामध्ये तालुकाप्रमुख, करमाळा शहर प्रमुख, केम शहर प्रमुख, जेऊर शहर प्रमुख यासह 118 गावातील नवीन शाखाप्रमुख, प्रत्येकी पाच उपशहर प्रमुख, पाच उपतालुकाप्रमुख, जिल्हा परिषद गट प्रमुख, पंचायत समिती गटप्रमुख तसेच युवा सेनेचे तालुकाप्रमुख यासह सर्व पदाधिकारी, शिवसेना महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख सहित सर्व पदाधिकारी यांची नव्याने नियुक्ती करण्यात येणार आहे, तरी इच्छुकांनी शिवसेना करमाळा कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group