Monday, April 21, 2025
Latest:
करमाळासकारात्मकसामाजिक

मराठा समाजाबरोबर अठरा पगड जाती-धर्मांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटीबद्ध-आनंद मोरे

 

जेऊर प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील पुनवर येथे भारतीय मराठा महासंघाच्या शाखेच उद्घाटन तालुका अध्यक्ष आनंद मोरे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी मोरे बोलताना म्हणाले की, तालुक्यातील मराठा समाज तसेच आठराप्रगड जाती जमातीच्या सर्व प्रश्न सोडवण्यासाठी भारतीय मराठा महासंघ कटिबंध आहे. तसेच गावातील सर्व शासकीय कार्यालयात काही अडचण येत असल्यास संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले.यावेळी भारतीय मराठा महासंघाच्या तालुका संघटक पदी संतोष नरसाळे यांची निवड करण्यात आली. शाखा अध्यक्ष पदी नितीन जाधव उपाध्यक्ष पदी प्रशांत नरसाळे कार्याध्यक्ष पदी विनोद नरसाळे सचिव पदी महेश सावंत संघटक पदी राहुल जाधव खजिनदार पदी समाधान नरसाळे निवड करण्यात आली.यावेळी कोंढेज गावचे ग्रामपंचायत सदस्य गणेश सव्वासे, कार्याध्यक्ष धनंजय घोरपडे,तालुका उपाध्यक्ष नागनाथ नलवडे, प्रदिप पोळ,जमिर शेख गावचे सरपंच उपसरपंच सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group