अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था ब्राह्मण महासंघ यांच्यावतीने दिपक चव्हाण नरेंद्रसिंह ठाकुर यांचा सत्कार
करमाळा प्रतिनिधी करमाळयाचे सुपुत्र भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेश सचिव दिपक चव्हाण यांना दैनिक सकाळचा ॲायडाॕल ॲाफ महाराष्ट्र पुरस्कार राजपुत युवा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष नरेंद्रसिंह ठाकुर यांना सोलापुर सोशल फाऊडेंशनचा सामाजिक कार्य गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिक केंद्र करमाळा व ब्राह्मण महासंघ श्री देवीचा माळ यांच्या वतीने अध्यक्ष संतोष कुलकर्णी भाजप उद्योग आघाडीचे अध्यक्ष सचिव बाळासाहेब होसिंग यांच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी पत्रकार दिनेश मडके,राजेंद्र सुर्यपुजारी,श्रीनिवास पुराणिक,मनोज कुलकर्णी, रवींद्र विद्वत,निलेश गंधे,सारंग पुराणिक,सुनील देशमुख,सागर पुराणिक,सौरभ शास्त्री,सागर कुलकर्णी,आदिनाथ खुटाळे यांच्यासह श्रीदेवीचामाळ ब्राम्हण संघाचे कार्यकर्त व ग्रामस्थ उपस्थित होते.
