विकासरत्न आमदार संजयमामा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त 104 जणांनी कोर्टी येथे रक्तदान
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील कोर्टी येथे करमाळा तालुक्याचे विकासरत्न आमदार मा.श्री संजय मामा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त दि.30 जुलै 2022 रोजी सांस्कृतिक भवन ,कोर्टी. येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामधे 104 नागरिकांनी रक्तदान केले.या रक्तदान शिबिराचे आयोजन श्री.सुभाष अभंग व राजुरी ग्रामपंचायतचे सरपं श्री.डॉ.अमोल दुरंदे यांनी केले.शिबिराचे उद्घाटन व प्रथम रक्तदान करणारे ईश्वर शिंदे या तरुण युवकाच्या हस्ते करण्यात आले.रक्तदान शिबिर सुरळीत व यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी कोर्टी गावातील अनेक सामाजिक व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींनी सहकार्य केले त्यामध्ये श्री.निलकंठ अभंग, श्री.सतीश शेळके, सावडी ग्रामपंचायतचे सरपंच श्री. भाऊ शेळके, श्री.आर .आर (बापू ) साखरे,श्री.गणेश जाधव, श्री.जाधव मेजर ,श्री. नवनाथ दुरंदे, श्री.दत्तात्रय दुरंदे. शिबिरासाठी भगवंत ब्लड बँक, बार्शी यांनी सहकार्य केले.वैद्यकीय तज्ज्ञांनी उपस्थित राहून नागरिकांना रक्तदानाचे महत्व पटवून सांगितले.
