मराठा समाजाच्या आरक्षणाची मागण्या मान्य करण्यासाठी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा 22 सप्टेंबरला करमाळा बंदचे आवाहन
करमाळा प्रतिनिधी मराठा समाजाच्या मागण्या मान्य करण्यासाठी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून 22 सप्टेंबरला करमाळा बंदचे आवाहन सकल मराठा समाज बहुजन समाज यांच्यावतीने करण्यात आले आहे . याबाबत सकल मराठा समाजाच्यावतीने असे म्हटले आहे की मराठा संघर्षयोद्धा श्री मनोज दादा जरांगे पाटील यांची तब्येत खालावत चाललेली असून श्री मनोज दादा जरांगे पाटील यांनी ज्या मागण्या सरकार पुढे मांडल्या आहेत त्या तात्काळ मंजूर करून घ्याव्यात जर जरांगे पाटील यांच्या जीवाचे काही बरे वाईट झाले तर याला संपूर्ण महाराष्ट्र राज्य शासन जबाबदार असेल संघर्षयोद्धा श्री जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठिंबा म्हणून सकल मराठा समाज व बहुजन समाज करमाळा च्या वतीने करमाळा शहर व तालुका बंद चे आवाहन करण्यात येत आहे उद्या रविवार दिनांक २२ सप्टेंबर २०२४ रोजी करमाळा बंद चे आवाहन करण्यात आले आहे.सकल मराठा समाज व बहुजन बांधव करमाळा शहर व तालुका यांना सुचित करण्यात येते की उद्या 22 सप्टेंबर रोजीसकाळी १०.०० वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले आहे .