करमाळा

जैन साधू कामकुमार नंदी यांच्या हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ करमाळा सकल जैन समाजाचा मूक मोर्चा

करमाळा प्रतिनिधी : कर्नाटकात झालेल्या जैन साधू कामकुमार नंदी यांच्या हत्याप्रकरणाचा निषेध करण्यासाठी करमाळा शहरात सकल जैन समाज बांधवाच्या वतीने गुरुवारी दंडाला काळे रेबीन बांधून मूक मोर्चा काढण्यात आला. यामध्ये हजारोच्या संख्येने बांधव सहभागी झाले. करमाळा शहरातील सर्व समाज बांधवांनी दुकाने बंद ठेवून निषेध पाळण्यात आला. यात महिलांची संख्या लक्षणीय होती. महसूलचे नायब तहसीलदार शैलेश निकम यांनी मोर्चेकरांचे निवेदन स्विकारले. यावेळी समीर पटेल उपस्थित होते.

जैन मंदिर येथून हा मोर्चा निघाला. करमाळा तहसील कार्यालय येथे संपन्न  झाला येथे मोर्चा येताच डॉ. सुनिता दोशी यांनी घटनेचा निषेध करत मनोगत व्यक्त केले. या मोर्चाला आरपीआयचे लक्ष्मण भोसले यांनी पाठिंबा दिला. पोलिस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक एम. एन. जगदाळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर कुंजीर यांनी बंदोबस्त ठेवला होता.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group