करमाळा

जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा म्हणून काम करणारे उद्योजक भरत भाऊ आवताडे यांचे कार्य प्रेरणादायी- किरण तात्या सावंत

करमाळा प्रतिनिधी जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा म्हणून काम करणारे करणारे संघर्षमय जीवनातून यशस्वी उद्योजक झालेले भरत भाऊ आवताडे यांचे कार्य प्रेरणादायी आहे असे मत भैरवनाथ शुगर कारखान्याचे कार्यकारी संचालक किरण तात्या सावंत यांनी व्यक्त केले. उद्योजक भरत भाऊ आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार समारंभप्रसंगी ते बोलत होते. या सत्कार कार्यक्रमप्रसंगी मनसे जिल्हा उपाध्यक्ष नानासाहेब मोरे युवा नेते अमोल परदेशी सामाजिक कार्यकर्ते महादेव आण्णा फंड नगरसेवक अतुल फंड रामचंद्र पवार ओंकार चांदगुडे आकाश अवताडे सुनील काटे उपस्थित होते. पुढे बोलताना किरण तात्या सावंत म्हणाले की भरत भाऊ अवताडे यांची बऱ्याच वर्षापासुन आपली मैत्री असून प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यशस्वी जीवन कसे जगावे सामाजिक कार्यातून सर्वसामान्य जनतेची प्रश्न सोडून लोकांच्या मनावर अधिराज्य करणारे भरत भाऊ यांचा जीवन प्रवास थक्क करणारा असून सामाजिक कार्यकर्ता ती यशस्वी राजकारणी म्हणून लवकरच जनता त्यांना त्यांच्या कामाची पोचपावती येणाऱ्या निवडणुकीमध्ये देणार असून आई कमला भवानी मातेचा आशीर्वाद जनतेचे पाठबळ याचबरोबर आमच्या मैत्रीची साथ त्यांना कायम राहणार असून त्यांच्या सर्व कार्यास आपण सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले.करमाळा तालुक्यातील विविध गावांमधून भरत भाऊ अवताडे यांना कार्यकर्त्यांनी मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून सत्कार करून दूरध्वनी द्वारी सोशल मीडियाद्वारे शुभेच्छा दिल्या असून सर्वसामान्य जनतेचा विश्वास भरत भाऊंनी मिळवला असून सर्वसामान्य जनतेच्या हाकेला धावणारा नेता म्हणून भरत भाऊ यांची ओळख झाली आहे.करमाळा तालुक्याचे विकासप्रिय आमदार संजय मामा शिंदे यांच्या माध्यमातून आपल्या गावाबरोबरच पंचक्रोशीमधील रस्ते पाणी वीज याबरोबरच तालुक्यातील विविध प्रश्न सोडवल्याने आपल्या हक्काचा माणुस म्हणुन सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये स्थान मिळवुन भरतभाऊंचा वाढदिवस जन्मभूमी असलेले फिसरे गावाबरोबर पंचक्रोशीतील गावामध्ये मोठ्या उत्साहात आनंदात साजरा करण्यात आला.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group