करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये स्वच्छता अभियानाचा शुभारंभ
करमाळा प्रतिनिधी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शंभर दिवसाच्या विकास आराखडा अंतर्गत मुख्यमंत्री कृषी उत्पन्न बाजार समिती स्वच्छ बाजार आवार अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीमेचा शुभारंभ आमदार नारायण (आबा )पाटील व बाजार समितीचे सभापती तथा माजी आमदार जयवंतराव जगताप यांचे शुभहस्ते करण्यात आला .
या प्रसंगी बाजार समितीचे संचालक नवनाथ झोळ, जनार्धन नलवडे, मनोज पितळे , नागनाथ लकडे,आदिनाथ साखर कारखान्याचे संचालक देवानंद बागल, ॲड राहूल सावंत , डॉ अमोल घाडगे , महेंद्र पाटील , दादासाहेब पाटील, डॉ हरीदास केवारे, हनुमंत सरडे,राजाभाऊ कदम , महादेव पोरे ,माजी नगराध्यक्ष प्रशांत ढाळे, खरेदी विक्री संघाचे संचालक दादासाहेब लबडे, शहाजी शिंगटे, उद्योजक संतोष गुगळे , विक्रांत मंडलेचा , मयूर दोशी, उत्कर्ष गांधी, प्रितम लुंकड यांचे सह आदिनाथ कारखाना ,बाजार समिती व खरेदी विक्री संघाचे संचालक ,शेतकरी, व्यापारी, कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते . आभार बाजार समितीचे सचिव विठ्ठल क्षिरसागर यांनी मानले .


