करमाळा शहरातील कृत्रिम पाणीटंचाईची समस्या सोडविण्यासाठी दहीगाव पंपींग स्टेशन येथे नियमित वीज पुरवठा साठी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना निवेदन
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील कृत्रिम पाणी टंचाईची समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी दहीगाव ता, करमाळा येथील दहीगाव पंपींग स्टेशन येथे नियमित वीज पुरवठा करण्यात यावा यामध्ये खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी लक्ष घालावे यासाठी करमाळा नगर परिषदेचे माजी नगरसेवक संजय सावंत, माजी नगरसेवक फारुक जमादार, आदिनाथ सहकारी साखर कारखान्यांचे संचालक ऍड राहुल सावंत, महेश मोरे, पांडुरंग सावंत, बापू उबाळे यांनी निवेदन दिले
यावेळी मोहिते पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, करमाळा नगरपरिषदेच्या दहीगाव पंपींग स्टेशन येथे नियमित पणे वीज पुरवठा होत नाही तसेच रात्री च्या वेळी वीज पुरवठा खंडित झाल्यास कर्मचारी सकाळी येतात अश्या घटना मुळे करमाळा शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे गेल्या अनेक दिवसांपासून करमाळा नगरपरिषदेचा पाणी पुरवठा विस्कळीत होत असल्यामुळे आज माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची भेट घेऊन दहीगाव येथील वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा असे निवेदनात म्हटले आहे.


